दहीहंडीचा पहिला बळी, धारावीत थर रचताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 18:33 IST2018-09-03T18:33:21+5:302018-09-03T18:33:34+5:30
मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होणा-या दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे.

दहीहंडीचा पहिला बळी, धारावीत थर रचताना 26 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
मुंबईः मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा होणा-या दही हंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. धारावीत थर रचताना एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी फोडण्यासाठी थर रचत असताना चक्कर आल्यानं कुश खांदारेचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सायन रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. धारावी येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या दहीहंडीत दुपारी ३.३० च्या सुमारास पहिल्या थरावर चढत असताना कुशला फिट आली. त्यानंतर त्याला उपचारांसाठी सायन रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याशिवाय, शहर-उपनगरातील उत्सवात ६० गोविंदा आतापर्यंत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
Dahi Handi 2018 : मुंबईत आतापर्यंत 11 गोविंदा जखमी