दादर झाला ‘हॉटस्पॉट’, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 04:19 AM2020-08-02T04:19:10+5:302020-08-02T04:19:47+5:30

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ । एकाच दिवसांत ३२ जणांना संसर्ग

Dadar became a ‘hotspot’, an increase in coronary artery disease | दादर झाला ‘हॉटस्पॉट’, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ

दादर झाला ‘हॉटस्पॉट’, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ

googlenewsNext

मुंबई : आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात गेल्या महिन्याभरात दररोज तीन-चार कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. मात्र दादर आणि माहीम परिसरात रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असल्याने मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादर परिसरात गर्दी वाढल्याने संसर्गाचा धोकाही वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत गेल्यामुळे जी उत्तर विभागाच्या कामगिरीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले होते. सुरुवातीच्या काळात या विभागातील धारावी वगळता माहीम आणि दादरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अत्यंत कमी होती. त्यामुळे महापालिकेचे लक्ष प्रामुख्याने धारावी परिसरातील उपाययोजनांवर राहिले. त्याचे चांगले परिणाम आता धारावी परिसरात दिसून येत आहे.

संपूर्ण जुलै महिन्यात धारावीमध्ये दररोज तीन ते चार रुग्ण आढळून आले. दादर आणि माहीम परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. दादर, माहीम परिसर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने लॉकडाऊन खुले झाल्यानंतर येथील दुकाने, मंडई सुरू झाली आहेत. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. शनिवारी धारावीत चार बाधित रुग्ण सापडले. तर दादरमध्ये एकाच दिवसात ३२ आणि माहीम परिसरात २३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

1६१४ बाधित क्षेत्रात नऊ लाख ६९ हजार ५२६ निवास, ४१ लाख १८ हजार ८९६ लोकसंख्या असून या भागात आतापर्यंत ३० हजार ९४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 
2 प्रतिबंधित केलेल्या ५४०९ इमारतींमध्ये दोन लाख ४० हजार ८६० निवास, आठ लाख ८५ हजार ११० लोकसंख्या आहे. या भागात आतापर्यंत २१ हजार ३८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

बाधित रुग्णांना लवकरात लवकर उपचार देणे महत्त्वाचे आहे. यासाठी दादरमध्ये मोफत चाचणी केंद्रही सुरू करण्यात आले आहे. तसेच फिव्हर कॅम्पचे प्रमाणही जी उत्तर विभागात अधिक आहे. जास्तीत जास्त लोकांची चाचणी केली जात असल्याने संख्या वाढलेली दिसून येते.
- किरण दिघावकर,
सहायक महापालिका आयुक्त, जी उत्तर विभाग

‘जी उत्तर विभाग रुग्णसंख्या
(३१ जुलैपर्यंत)
ठिकाण पॉझिटिव्ह डिस्चार्ज सक्रिय
धारावी २५६० २२३५ ७२
दादर १८०७ १२५० ४८२
माहीम १७१८ १४२२ २२४
एकूण ६०८५ ४९०७ ७७८

असे होत गेले बदल
महिना इमारती बाधित क्षेत्र
मे ३०९७ ६९६
जून ४५३८ ७९८
जुलै १ ते १० ६५९७ ७५१
१७ जुलै रोजी ६२३५ ७०८
२४ जुलै ६१६९ ६३१
२७ जुलै ५९६० ६२२
३१ जुलै ५४०९ ६१४

सर्वाधिक इमारती सील असलेले विभाग
विभाग १७ जुलै २४ जुलै २७ जुलै ३१ जुलै
आर मध्य : बोरीवली ७२० ७६६ ६७३ ७२३
आर दक्षिण : कांदिवली ५९६ ५२१ ५२६ ४२६
के पूर्व : अंधेरी पूर्व ७१६ ७९९ ९२१ ४१४

Web Title: Dadar became a ‘hotspot’, an increase in coronary artery disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.