डी. वाय. पाटील यांच्या नातवाला अटकेपासून अंतरिम दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 08:57 IST2025-03-30T08:57:35+5:302025-03-30T08:57:51+5:30

Court News: बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे नातू व माजी मंत्री सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज यांना बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. न्यायालयाने पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली. 

D. Y. Patil's grandson gets interim relief from arrest | डी. वाय. पाटील यांच्या नातवाला अटकेपासून अंतरिम दिलासा

डी. वाय. पाटील यांच्या नातवाला अटकेपासून अंतरिम दिलासा

मुंबई - बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे नातू व माजी मंत्री सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज यांना बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. न्यायालयाने पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवली.

पृथ्वीराज यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने दिलासा न दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पृथ्वीराज यांच्या याचिकेत पीडितेचीही बाजू ऐकली पाहिजे. त्यामुळे तिला याचिकेत प्रतिवादी करावे, अशी मागणी सरकारी वकील आणि पाटील यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी यांनी न्यायालयाला केली.

न्या. राजेश पाटील यांच्या एकलपीठाने पीडितेला प्रतिवादी करण्यासाठी याचिकेत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दोन्ही पक्षांना दिले. जर तातडीने सुधारणा करण्यात आली नाही तर न्यायालय अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले, असा इशारा न्यायालयाने पाटील यांना दिला.  तपास यंत्रणेद्वारे पीडितेला नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायालयाने पृथ्वीराज पाटील यांना १६ व १७ एप्रिल रोजी तपास यंत्रणेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. विवाहाचे आमिष देऊन एका २९ वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील यांच्यावर आहे. ठाणे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये महिलेची पाटील यांच्याशी एका मॉलमध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पाटील यांनी आरोप फेटाळत म्हटले की, हा हनी ट्रॅपचा प्रकार आहे. तक्रारदाराने अशाच प्रकारे प्रभावशाली व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पाटील ठाण्याला कधीच गेले नाही. त्यांचे लग्न झाले आहे आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. महिलेने मोठी रक्कम वसूलही केली आहे, असे पाटील यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

Web Title: D. Y. Patil's grandson gets interim relief from arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.