मुलांसाठी क्युरियॉसिटी कार्निव्हल; अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:24 AM2019-08-07T03:24:54+5:302019-08-07T03:25:06+5:30

३० हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Curiosity Carnival for Kids | मुलांसाठी क्युरियॉसिटी कार्निव्हल; अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचा उपक्रम

मुलांसाठी क्युरियॉसिटी कार्निव्हल; अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचा उपक्रम

Next

मुंबई : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात विद्यार्थी आणि अभ्यागतांसाठी मंगळवारी ‘बनाओ बस’ प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती. निमित्त होते ते अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या क्युरियॉसिटी कार्निव्हलचे. या बसच्या निमित्ताने विज्ञानाशी निगडित साधन सामुग्री मुलांना पाहता येणार असून, पहिल्या वर्षात बनाओ बस ३ हजार मुलांपर्यंत पोहोचणार आहे. तीन महिन्यांत कार्निव्हलच्या माध्यमातून मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील ३० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, असा दावा फाउंडेशनने केला आहे.

तंत्रज्ञानामुळे आपल्या परंपरा पुसल्या जाण्यापेक्षा किंवा त्याच्या परिणामांचे वेगळे परिणाम दिसण्याऐवजी लोकांना त्यांचा लाभ घेण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. म्हणून मुलांना अनुभवातून प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मेकर किंवा उत्पादक चळवळीची मदत होणार आहे, असे अगस्त्यातर्फे सांगण्यात आले.

यात ३ डी प्रिंटिंग, कोडिंग आणि मायक्रोप्रोसेसर या नवख्यांसाठीच्या आणि बालकस्नेही साधनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, दोन बनाओ बसचा समावेश असलेल्या क्युरियॉसिटी कार्निव्हलमध्ये सुविधा व टूल किट्स असतील. त्यांच्या मदतीने मुलांना आपल्या कल्पनांचे प्रोटोटाइप करता येईल. दोन प्रशिक्षित मार्गदर्शक मुलांना शिकवतील.

अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष रामजी राघवन यांनी सांगितले की, कुतूहलता लोप पावत चालली आहे. २ ते ४ वर्षे वयोगटाच्या मुलांमध्ये ९८ टक्के मुलं कुतूहलापोटी प्रश्न विचारताना दिसतात. मात्र, हिच मुले हायस्कूलमध्ये गेल्यावर याचे प्रमाण मात्र दहा टक्क्यांनी घटते. २१व्या शतकात प्रगती करण्यासाठी मुलांना प्रत्येक गोष्टीचे कुतूहल असणे, प्रश्नाचे उत्तर मिळविणे गरजेचे आहे. यावेळी चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, अर्चना चंद्रा, वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेड उपस्थित होते.

Web Title: Curiosity Carnival for Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.