राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 04:54 AM2020-08-18T04:54:43+5:302020-08-18T04:55:15+5:30

सध्या राज्यात १ लाख ५५ हजार २६८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

The cure rate of corona in the state is 70.9 per cent | राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण कोविडमुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के झाले आहे. राज्यात सोमवारी ८ हजार ४९३ कोरोनाचे रुग्ण आढळले असून २२८ मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत कोरोनाचे एकूण २० हजार २६५ बळी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख ५५ हजार २६८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील मृत्युदर ३.३५ टक्के आहे. दिवसभरात २२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून त्यात मुंबईत ४०, ठाणे ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा ६, भिवंडी-निजामपूर मनपा २, मीरा-भार्इंदर मनपा १, वसई-विरार मनपा २, रायगड १०, नाशिक २, नाशिक मनपा ५ आदी रुग्णांचा समावेश आहे.
>मुंबईत दिवसभरात ७५३ रुग्ण, ४० मृत्यू
म्मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे ७५३ रुग्ण आढळले असून ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २९ हजार ४७९ इतकी झाली असून बळींचा आकडा ७ हजार १७३ एवढा झाला आहे. सध्या १७ हजार ७०४ सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहर, उपनगरात बरे झालेल्या रुग्णांचा दर ८० टक्के झाला असून रुग्ण दुपटीचा दर ८६ दिवसांवर गेला आहे.

Web Title: The cure rate of corona in the state is 70.9 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.