महाविद्यालयांत मराठी एकांकिका स्पर्धा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:44 IST2025-01-15T06:35:31+5:302025-01-15T06:44:29+5:30

विजेत्या एकांकिकेला गुणानुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

Cultural Affairs Minister Ashish Shelar announces Marathi one-act play competition in colleges | महाविद्यालयांत मराठी एकांकिका स्पर्धा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

महाविद्यालयांत मराठी एकांकिका स्पर्धा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार आहे.  या स्पर्धेत तालीम, प्राथमिक आणि अंतिम अशा तीन फेरी आहेत. या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

अशी असणार बक्षिसे
विजेत्या एकांकिकेला गुणानुक्रमे १ लाख, ७५ हजार आणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच उत्कृष्ट बोलीभाषा एकांकिकेला ५० हजारांचे प्रथम बक्षीस आहे.  तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, अभिनय अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

अंतिम फेरी मुंबईत रंगणार
स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ३६ केंद्रांवर तालीम फेरी पार पडेल. तालीम फेरीत सादर होणाऱ्या एकांकिकेची प्राथमिक फेरीत निवड होईल. या निवड झालेल्या संघांना एकांकिकेच्या तयारीसाठी दहा हजार रुपये नाट्यनिर्मिती खर्च दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यातील सहा महसुली विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक फेरी होणार आहे, तर मुंबईत अंतिम फेरी रंगणार आहे.

Web Title: Cultural Affairs Minister Ashish Shelar announces Marathi one-act play competition in colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.