Cruise service from Mumbai to Diu, Surat | मुंबई ते दिव, सुरतसाठी क्रुझसेवा सुरू
मुंबई ते दिव, सुरतसाठी क्रुझसेवा सुरू

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून जलपर्यटनाला चांगले दिवस येऊ लागले असून, मुंबई ते गोवा दरम्यान सुरू असलेल्या क्रुझसेवेपाठोपाठ आता मुंबई ते दीव व मुंबई ते सूरत दरम्यान क्रुझसेवा सुरू करण्यात आली आहे. जलपर्यटनाचे प्रमाण वाढीस लागल्याने नवनवीन ठिकाणी क्रुझसेवा सुरू करण्यात येत आहे.

आजपर्यंत वांद्रे-वरळी सी लिंक वरून प्रवास करण्याची संधी मिळत असलेल्या मुंबईकरांना आता वांद्रे-वरळी सी लिंक खालून क्रुझमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. वांद्रे- वरळी सी लिंक येथील बंदरातून गुजरातमधील हजिरा बंदरात जाण्यासाठी क्रुझसेवा सुरू करण्यात आली आहे. छोट्या बंदरांना जोडण्याचे धेय ठेवून ही सेवा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, गुजरात मेरिटाइम बोर्ड यांच्या सहकार्याने मुंबई मेडनतर्फे ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

मुंबई मेडनचे कॅप्टन संजीव अग्रवाल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी प्रवीण खारा, ब्रँड अ‍ॅम्बेसिडर टिंष्ट्वकल सेहगल यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेवेचा प्रारंभ करत असल्याचे जाहीर करण्यात आले. जलपर्यटनाकडे पर्यटकांचा ओढा वाढत असून या माध्यमातून महाराष्ट्र व गुजरातमधील दोन बंदरांना जोडण्याचा प्रयत्न असल्याचे अग्रवाल म्हणाले. मेरिटाइम बोर्डाचे जलपर्यटन वाढविण्याचे धेय असून, त्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत असल्याचे खारा म्हणाले, तर सी लिंक खालून जाणाऱ्या या क्रुझच्या माध्यमातून पर्यटकांना चांगला पर्याय मिळत असून, पर्यटकांचा याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सेहगल यांनी व्यक्त केला. या सेवेद्वारे जलपर्यटनातील एक नवीन दालन सुरू करण्यात आले असून, वैविध्याच्या शोधात असलेल्या पर्यटकांसाठी हा उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास सेहगल यांनी व्यक्त केला.

मुंबई ते दिवसाठी जलेशची सेवा सुरू
जलेश-कर्णिकाच्या मुंबई दिवसेवेला नुकताच प्रारंभ झाला. दिव येथे जाण्यासाठी पर्यटकांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. दिवच्या जिल्हाधिकारी सलोनी राय यांच्या उपस्थितीत जलेशचे स्वागत करण्यात आले. गोवा, गणपतीपुळे या मार्गावर जलेशच्या सेवा चालविण्यात येत आहेत़ त्यामध्ये दीवचा समावेश झाला आहे. देशातील पहिल्या प्रीमियम क्रुझचा मान मिळविणाºया जलेश कर्णिकाला जलपर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जलपर्यटनासाठी विदेशात जावे लागणाºया पर्यटकांना आता मुंबईत हा पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटक याकडे वळत आहेत. आगामी काळात इतर ठिकाणी सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असून, लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Cruise service from Mumbai to Diu, Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.