दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना दादर येथून शस्त्रांसह अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 22:49 IST2018-06-29T22:49:19+5:302018-06-29T22:49:33+5:30

दादर येथील फाईव्ह गार्डन परिसरातील बंगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्याला घेरून त्यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने अटक केली आहे.

The criminals who are preparing for the robbery are arrested with arms from Dadar | दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना दादर येथून शस्त्रांसह अटक 

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना दादर येथून शस्त्रांसह अटक 

मुंबई - दादर येथील फाईव्ह गार्डन परिसरातील बंगल्यातील वयोवृद्ध दाम्पत्याला घेरून त्यांच्या घरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ४ ने अटक केली आहे. त्यांच्याजवळील एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चाकू, रस्सी, चिकटपट्टी इत्यादी दरोड्याचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. 

आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास दादर येथील फाईव्ह गार्डनजवळ दरोडा घालण्यासाठी टोळी जमणार असल्याची माहिती कक्ष - ४ ला मिळाली होती. त्यानुसर पोलिसांच्या दोन पथकांनी सापळा रचून एडणवाला रोडवरील माटुंग्याकडे जाणाऱ्या बस रूट क्रमांक १७१ च्या बस स्टॉपवरून चार गुन्हेगारांना अटक केली. पोलीस प्रवासी बनून बस स्टॉपवर घेरून होते आणि गुन्हेगारांच्या संभाषणाचा कानोसा घेत होते. हि पाच जणांची टोळी दरोडा घालण्यास आल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली, तर एकाने बळाचा वापर करून झटापट करून पळ काढला. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे दरोडेखोरांना जेरबंद करण्यास आणि त्यांचा कट उधळण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. 

Web Title: The criminals who are preparing for the robbery are arrested with arms from Dadar