आता विनाहेल्मेट फिरणाऱ्याविरुद्ध दाखल होणार गुन्हे; विनाकारण हॉर्न वाजविणारेही रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:25 IST2022-04-04T15:23:21+5:302022-04-04T15:25:01+5:30
मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू असताना आता विनाहेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणारेही आयुक्त संजय पांडे ...

आता विनाहेल्मेट फिरणाऱ्याविरुद्ध दाखल होणार गुन्हे; विनाकारण हॉर्न वाजविणारेही रडारवर
मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू असताना आता विनाहेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणारेही आयुक्त संजय पांडे यांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यावरही थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांकडून देण्यात आला आहे.
संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधत कामाचा लेखाजोखा मांडला. यादरम्यान संडेस्ट्रीटला नागरिकांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत आनंद व्यक्त केला. यावेळी विनाहेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वी आयुक्तांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांवर आता गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. गेल्या २० दिवसांत मुंबईतून तब्बल ४,६८९ खटारा हटवण्यात आले आहे. तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या विरोधात २,१८३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे विनाहेल्मेटवरील कारवाईचा वेग वाढणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
ड्रग्जवरील कारवाईलाही सुरुवात
ड्रग्जवरील कारवाईला सुरुवात करत २४ तासांत मुंबईत ड्रग्ज सेवनासंबंधित ४१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये ४३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ लाख २४ हजार ७५० रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तसेच ड्रग्ज तस्करी प्रकरणी ५ गुन्हे नोंदवत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.