Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' आरोपप्रकरणी क्राईम ब्रँचने मागितले संजय राऊतांकडे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 05:24 IST

मुख्यमंत्री कार्यालय आरोप प्रकरण

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील काही अट्टल गुन्हेगारांशी संपर्क केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर, मुख्यमंत्री कार्यालयाने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून त्याची चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, शनिवारी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ७ कडून संजय राऊत यांना पत्र पाठवून याबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. 

संजय राऊत यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालवली जात असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या काही तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला होता. काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीच्या आधी बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री कार्यालयातील या गोष्टींवर नजर ठेवली पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. राऊतांनी केलेल्या या आरोपांची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत,  या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेकडून त्यांना पत्र पाठवून, केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :गुन्हेगारीसंजय राऊत