Join us

'निर्भया फंड' खर्च करण्यासाठी कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 19:15 IST

हैदराबाद आणि उन्नावच्या घटनेनं संपूर्ण देश व्यथित झाला आहे. आरोपींना तात्काळ फाशीची

मुंबई - महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सध्या देश हादरला आहे. हैदराबाद आणि उन्नावमधील दोन्ही घटनांमुळे जनमानस खवळले आहे. आठ दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशुवैद्यक महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तर, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला गुरूवारी पेटवून देण्यात आले, या घटनेत तिचा मृत्यू झाला. मात्र, फडणवीस सरकारने गेल्या 5 वर्षात निर्भया फंडाच्या रकमेतील एक रुपयाही खर्ची केला नाही. आता, उद्धव ठाकरेंनी या निधीच्या विनियोगाच्या सूचना दिल्या आहेत. 

हैदराबाद आणि उन्नावच्या घटनेनं संपूर्ण देश व्यथित झाला आहे. आरोपींना तात्काळ फाशीची, शिक्षेची मागणी देशवासियांकडून होत आहे. त्यावरुनच काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं. देवेंद्र फडणवीस सरकारने निर्भया फंडमधील एकही रुपया खर्चला नसल्याचं काँग्रेसने सांगितलं. त्यानंतर, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावरुन देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. मी अद्याप लक्षात नाही आलं की, गेल्या सरकारनं हा निधी का खर्च केला नाही, असे ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच, निर्भया फंडातील निधीचा योग्य विनियोग करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.   

उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. 

निर्भया फंडाच्या विनियोग करा गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, राज्य सरकारला केंद्र सरकारकडून निर्भया फंड योजनेंतर्गत 14 हजार 940 कोटी रुपयांचा निधी पाठविण्यात आला आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानिर्भया गॅंगरेपनिधी