अवैध धंद्यांवर धडक कारवाई करा; आमदार रवींद्र वायकर यांच्या पोलिसांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:59 PM2021-10-29T23:59:32+5:302021-10-30T00:02:42+5:30

जोगेश्‍वरीत विधानसभा क्षेत्रातील ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी सुचना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. 

Crack down on illegal trades; MLA Ravindra Vaikar's instructions to the police | अवैध धंद्यांवर धडक कारवाई करा; आमदार रवींद्र वायकर यांच्या पोलिसांना सूचना

अवैध धंद्यांवर धडक कारवाई करा; आमदार रवींद्र वायकर यांच्या पोलिसांना सूचना

Next

मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस विभाग हा एक आदर्श विभाग आहे. कोरोनात लॉकडाऊनचा फायदा उचलत जोगेश्‍वरीत विधानसभा क्षेत्रातील ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी सुचना जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पोलिसांना केली. याच बरोबर, जनतेच्या अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने आमदार निधीतून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले आहेत.

जोगेश्‍वरीतील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात वायकर यांनी पोलीस अधिकार्‍यांसोबत त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त डॉ. महेश्‍वरी रेड्डी, जोगेश्‍वरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यु. एस. कदम, मेघवाडीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एस. बी. पिंपळे, एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जे. एस. शिंदे, तसेच जोगेश्‍वरी वाहतुक विभागाचे पोलीस अधिकारी एस. डी. महाले, नगरसेवक बाळा नर,नगरसेवक  प्रविण शिंदे, विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला संघटक शालिनी सावंत व इत पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर अन्य जबाबदारी असल्याने, जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विजय साळस्कर उद्यान, हेमंत करकरे उद्यान, दुर्गानगरच्या मागील आरे कॉलनीच्या भागात, शामनगर तलावाच्या पाठीमागे, म्हाडा कॉलनी मैदान, संजयनगर, मेघवाडी कब्रस्तान शेजारी, इंदिरानगर, तक्षशिला, कोकण नगर आदी ठिकाणी अवैध धंदे, चरस विकणारे, गर्दुले, महिलांची छेडछाड आदी घटनांमध्ये वाढ झाली. यासंबंधात जोगेश्‍वरीतील जनतेने आमदार वायकर यांची भेट घेऊन विभागात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. याची गंभीर दखल घेत वायकर यांनी पोलीस उपायुक्त व संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक बोलावली होती. 

या बैठकीत उपस्थित जनतेने विधानसभा क्षेत्रातील विविध भागात उघडपणे सुरू असलेल्या अवैध व यामुळे स्थानिक जनतेला होणारा त्रास याची माहिती उपस्थित पोलीस अधिकार्‍यांना दिली. त्यामुळे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच निर्जनस्थळी पोलिसांचे पेट्रोलिंग वाढविण्यात यावे, अशी मागणी केली. 

यावर पोलीस उपायुक्त डॉ. महेश्‍वरी रेड्डी यांनी, विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून, असे व्यवसाय करणार्‍यांची नावे पोलिसांना मिळाली असून लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. विधानसभा क्षेत्रातील निर्जनस्थळांची माहिती काढण्यात आली असून त्या ठिकाणी स्थानिकांना पुरेशा लाईटची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार अनेक ठिकाणी क्युराकोड तयार करण्यात आले असून ते त्या-त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याचे बिट मार्शल त्या ठिकाणाला सातत्याने भेट देत असतात.अजून ज्या ठिकाणी क्युआर कोड बसविण्याची मागणी जनतेने केल्यास, अशा ठिकाणची यादी संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात यावी, त्यानुसार क्युआरकोड तयार करून त्या-त्या ठिकाणी लावण्यात येतील तसेच त्या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंगही वाढविण्यात येईल, असे आश्‍वासनही पोलीस उपायुक्त रेड्डी यांनी दिले.

जनतेचा त्रास कमी करण्यासाठी ज्या भागांमध्ये अवैध पार्कींग करण्यात याले आहे, त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, विभागातील गांजा, चरसारखे घातक अमली पदार्थ विकणारे, अवैध दारुचे अड्डे, दुकाने यांच्यावरही पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई सुरु करावी, अशी सुचना केली. एवढेच नव्हे तर जनतेच्या अधिक सुरक्षिततेच्यादृष्टीने येथील निर्जनस्थळावर तसेच पोलिसांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी आमदार निधीतून दिवाबत्ती तसेच सीसी कॅमेरे बसविण्याची तयारी वायकर यांनी दर्शवली. हमरस्त्यावर ड्रेबिज टाकणार्‍यावर आळा बसविण्यासाठी सीसी कॅमेरा बसवून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना केल्या.

Web Title: Crack down on illegal trades; MLA Ravindra Vaikar's instructions to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.