Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली; सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 12:51 IST2025-03-11T12:50:46+5:302025-03-11T12:51:24+5:30
Prashant Koratkar : काही दिवसापूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली होती.

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली; सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश
Prashant Koratkar ( Marathi News ) : कोल्हापूरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी काही दिवसापूर्वी मिळाली होती. या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरटकर यांच्या जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कोणतेही हस्तक्षेप न करता कोल्हापूर न्यायालयात राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
हे प्रकरण कोल्हापूर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. यावेळी मुंबई उच्च न्यायालयात कोरटकर यांना दिलेले नियम वाचून दाखवण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी वकील असीम सरोदे यांनी माध्यसांसोबत संवाद साधला. असीम सरोदे म्हणाले, प्रशांत कोरटकर सध्या मुंबईत आहे. हे सर्वांना माहित आहे. पण तरीही त्याला अटक करत नाही याचं कारण काय आहे? त्यांना राजकीय संरक्षण आहे का? असा सवाल वकील असीम सरोदे यांनी केला.
उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले
कोल्हापूर कोर्टाचे निरिक्षण काढून टाका, असं कोर्टाने सांगितलं. दरम्यान, आज दुपारी कोल्हापूर कोर्टात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. यावर बोलताना असीम सरोदे म्हणाले, मी इंद्रजित सावंत यांच्यातर्फे कोर्टात होतो. आम्ही आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे असं आमचं आधीपासून मत होतं. पण सायंकाळी कोल्हापूरच्या कोर्टात कोरटकरला तात्पुरता अटकेपासून संरक्षणचा आदेश दिला पाहिजे असा अर्ज दिला. तेव्हा कोणाचंही म्हणणे ऐकून न घेता कोल्हापूर कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले. या आदेशाला महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याची कोर्टाने दखल घेतली, आता कोर्टाने कोल्हापूरच्या कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत, अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली.