Join us  

Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ दिग्गज खेळाडू, कलाकारांनी बदलले डीपी; तुम्हालाही वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 2:01 PM

राजकीय क्षेत्रातील दिग्गज, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, क्रिडा क्षेत्रातील दिग्गज, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थी व सामान्य नागरीक यांनी आपल्या सोशल मिडियाचा डी.पी. वर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला

मुंबई - राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कोरोना विरुद्ध योद्धा बनून सर्व जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्यातील काही जवानांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. अशा परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य, मनोबल उंचाविण्यासाठी व त्यांच्या सन्मानार्थ राज्यातील सर्वांनी आपआपल्या समाज माध्यमावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. त्याला दिग्गज खेळाडू, कलाकार मंडळींनी प्रतिसाद देत डीपी चेंज केले आहेत.

सोशल माध्यमात डी.पी. म्हणून पोलीस दलाचा लोगो ज्यांनी ठेवला, त्यात प्रामुख्याने शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आनंद महिंद्रा,  सलमान खान, रणविर सिंग, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, अजय देवगण,वरूण धवन, सुनील शेट्टी, करण जोहर, कतरिना कैफ, दिया मिर्झा  साजिद नडियादवाला, गझल सम्राट तलत अजिज व पिनाज मसानी, फॅशन डिझायनर  नीता लुल्ला, कोरिओग्राफर  लुबना आदमास  यांचा सह अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा समावेश आहे. या सर्व मान्यवरांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आभार व्यक्त केले आहेत.

कुर्ला, विनोबा भावे नगर पोलिस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल कलगुटकर यांचे कोरोनाने निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात आणखी सहा पोलीस बांधवांचे कोरोना मुळे निधन झालेले आहे . यासोबतच जवळपास १ हजारांच्या वर पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्याचा हा अतिशय कठीण काळ असून, आपल्या कार्यक्षमतेच्या दुप्पट क्षमतेने पोलीस सर्वत्र कार्य करत आहेत. अशावेळी त्यांचे मनोबल वाढावे, आपण एकटेच आहोत असे त्यांना वाटू नये, सर्व समाज त्यांच्या सोबत आहे. हे त्यांना दाखवून देण्यासाठी मी  माझ्या सोशल मीडियावर पोलिसांचा लोगो डी.पी. म्हणून ठेवला आहे तसेच इतरांनीही ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.    

दरम्यान, आपले पोलीस दल हे कोणतेही संकट येवो, जिवाची पर्वा न करता जनतेच्या संरक्षणासाठी उभे असते. अगदी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सुद्धा आपल्या जिवाची बाजी लावून महाराष्ट्र पोलीस दलाने राज्यातील जनतेचे संरक्षण केलेले आहे. अशाच प्रकारचे युद्ध आता या कोरोनाविरुद्ध आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना साथ द्यावी असं गृहमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर राजकीय क्षेत्रातील दिग्गज, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज, क्रिडा क्षेत्रातील दिग्गज, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थी व सामान्य नागरीक यांनी आपल्या सोशल मिडियाचा डी.पी. वर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोना संबधित रहस्यमय रोगाचा लहान मुलांना धोका; अमेरिकेसह अनेक देश चिंतेत!

येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

महिलेचा मृतदेह चितेवर ठेऊन पळाले लोक; ‘जे’ घडलं ते पाहून सगळेच झाले अवाक् मग..

“चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!

 

टॅग्स :मुंबई पोलीसमहाराष्ट्रअनिल देशमुखसचिन तेंडुलकरसलमान खानअक्षय कुमार