coronavirus: मरणाच्या दारातून रोज त्या ये-जा करतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:45 AM2020-05-12T03:45:21+5:302020-05-12T03:46:25+5:30

रुग्णसेवा म्हणजे देवाने दिलेले असे गिफ्ट आहे की, ज्यामुळे आम्हाला इतरांना नवा जन्म देण्याची, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची संधी मिळते़ यासारखे दुसरे समाधान नसल्याची प्रतिक्रिया जीटी रुग्णालयात परिचारिका असलेल्या सत्यशीला दळवी हसत देतात.

coronavirus: They come and go through the door of death every day ... | coronavirus: मरणाच्या दारातून रोज त्या ये-जा करतात...

coronavirus: मरणाच्या दारातून रोज त्या ये-जा करतात...

Next

- सीमा महांगडे 
मुंबई -  घरी दोन मुली, एक १० वर्षांची आणि एक १५ वर्षांची (नुकतीच दहावी दिलेली), ७६ वर्षांच्या सासूबाई आणि नवरा असं कुटुंब़ १३ दिवसांपासून एकाचीही भेट नाही. १५ वर्षांच्या मुलीवर घरातील जबाबदारी पडली तर १० वर्षांची मुलगी तू कधी येणार, तू कधी येणार, असे प्रश्न सारखी विचारतेय़ सत्यशीला सद्यपरिस्थितीत काहीच करू शकत नाहीत. ७ दिवस कोविड-१९च्या आयसीयू विभागातील रुग्णसेवेनंतर त्या अद्याप रुग्णालयातच आहेत. त्या निराश व हतबल नाहीत. एकदा का रिपोर्ट निगेटिव्ह आले की, नव्या दमाने रुग्णसेवेत हजर होण्यासाठी त्या तयार आहेत. रुग्णसेवा म्हणजे देवाने दिलेले असे गिफ्ट आहे की, ज्यामुळे आम्हाला इतरांना नवा जन्म देण्याची, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची संधी मिळते़ यासारखे दुसरे समाधान नसल्याची प्रतिक्रिया जीटी रुग्णालयात परिचारिका असलेल्या सत्यशीला दळवी हसत देतात.

भारतामध्ये आरोग्य सेवा आधीपासूनच दुर्लक्षित आहे़ रिक्त पदांची संख्या जैसे थे असल्याची खंत महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन व परिचर्या संशोधन विकास संस्थेच्या सरचिटणीस कमळ वायकोळे यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, रुग्णसेवेत असणाºया या परिचारिकांना राज्यात अद्याप नर्सिंग अलाउन्स आणि इतर भत्ते नाहीत. संकटकाळात कुटुंबाचाही विचार न करता सेवा देणाºया या परिचारिकांचा शासनाने विचार करावा़

सुरक्षा द्यायला हवी
जगभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रोज कोणता विषाणू आपण घरी घेऊन जातो याची आम्हाला माहितीही नसते़ परिचारिकांना सर्व सुरक्षिततेची साधने पुरविली गेल्यास या दबा धरून बसलेल्या कोरोना शत्रूला नक्कीच चारीमुंड्या चीत करून कोविड योद्धा असलेल्या या परिचारिका रिअल वॉरिअर ठरतील़ '

अत्यावश्यक सेवेतील आमच्यासारखे इतर कोविड योद्धे यांना सगळ्यांचे सहकार्य मिळाल्यास आपण या कोरोनाला नक्कीच हरवणार आहोत. एक दिवस नक्की येईल ज्या दिवशी कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नसेल आणि आम्ही पुन्हा आमच्या घरी आणि कामावर रुजू होऊ.
- सत्यशीला दळवी,
परिचारिका, जीटी हॉस्पिटल़

या सगळ्या परिस्थितीत पॉझिटिव्ह थिंकिंग हीच आपल्यासाठी इम्युनिटी बूस्टरचे काम करणार आहे. शिवाय घरच्यांची सुरक्षितता ही जपायची आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे, माणुसकीला नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवे.
- योगिता खामकर,
सीएनएस रेल्वे हॉस्पिटल,
जुईनगर

Web Title: coronavirus: They come and go through the door of death every day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.