Coronavirus: ... then hospital license revoked; Minister of State for Health Rajendra Patil-Yadavkar warns | Coronavirus : ...तर रुग्णालयाचा परवाना रद्द; आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा इशारा

Coronavirus : ...तर रुग्णालयाचा परवाना रद्द; आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा इशारा

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी या संकटाला सामोरे जात आहे, खासगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालय सरकारला मदत करीत आहेत, पण काही डॉक्टर्स व खासगी रुग्णालय त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत, परिणामी ही सेवा नाकारणाºया खासगी रुग्णालय व डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.
आरोग्याच्या दृष्टीने ही आणीबाणी देशावर आलेली आहे, अशा काळात सर्व घटक देशसेवा म्हणून आपापल्या परीने काम करीत आहेत. पण देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
या क्षेत्रात काम करणाºया सर्वच डॉक्टर्स आणि रुग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाºया सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात रुग्णांमध्ये लक्षणे आढळल्यास आपल्या परिसरातील शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी. खासगी डॉक्टरचे दवाखाने, बाह्यरुग्ण विभाग अथवा रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाºया रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल, असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले आहे.

Web Title: Coronavirus: ... then hospital license revoked; Minister of State for Health Rajendra Patil-Yadavkar warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.