Coronavirus : कोरोना, काळजी घ्या, काळजी करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 06:13 IST2020-03-17T06:13:17+5:302020-03-17T06:13:34+5:30
वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण आपल्या आरोग्याबाबत सर्व बाबतीत सुरक्षेची काळजी निश्चित घ्यायलाच हवी. मात्र त्यासोबतच वैचारिक पातळीवर विनाकारण चिंता करत बसून चालणार नाही.

Coronavirus : कोरोना, काळजी घ्या, काळजी करू नका!
- प्रल्हाद वामनराव पै
आजीव विश्वस्त, जीवनविद्या मिशन
कोरोनाचे जगभरातील वाढते प्रमाण पाहता त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ची व इतरांची काळजी घेणं गरजेचं आहे. जीवनविद्या तत्त्वज्ञानानुसार, आपण यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक - वैश्विक अशा दोन्ही स्तरांवर प्रयत्न करायला हवेत.
वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण आपल्या आरोग्याबाबत सर्व बाबतीत सुरक्षेची काळजी निश्चित घ्यायलाच हवी. मात्र त्यासोबतच वैचारिक पातळीवर विनाकारण चिंता करत बसून चालणार नाही.
आपल्या अंर्तमनाची शक्ती प्रचंड आहे. आपण ज्या सूचना अंतर्मनाला देत असतो, त्या अंतर्मन अगदी तंतोतंत पाळत असते.
वैयक्तिक पातळीवर आपण
या दोन शरीर साधना करू शकतो
शरीर साधना १ : परमेश्वर कृपेने माझी शरीरप्रकृती सर्वांथाने दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ आणि कार्यक्षम होत आहे आणि यासाठी मी माझ्या अंतर्मनाची खूप खूप कृतज्ञ आहे.
शरीर साधना २ : माझ्या शरीरातील प्रत्येक सेल, प्रत्येक ब्लड व्हेसल, प्रत्येक नर्व्ह, प्रत्येक टिश्यू, प्रत्येक मसल, प्रत्येक बोन, प्रत्येक जॉइंट, प्रत्येक आॅर्गन, प्रत्येक सिस्टीम, प्रत्येक ग्लँड दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ आणि कार्यक्षम होत आहे.
या शरीर साधना दिवसभरातून दोनदा म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना कमीत कमी पन्नास वेळा म्हणा. ज्यामुळे तुमच्या अंर्तमनाला शरीराबद्दल सकारात्मक सूचना मिळतील.
आपल्या सर्वांचे अंतर्मन एकमेकांना जोडलेले आहे. ज्यातून सर्वांचे मिळून सामूहिक-वैश्विक अंतर्मन तयार होत असते. जर आपण सर्वांनी ‘एक विचार’ अंतर्मनात धरून ठेवला तर त्या विचाराची शक्ती खूपच सामर्थ्यशाली होते. म्हणूनच आपण यावर सार्वजनिक आणि वैश्विक
पातळीवर हा उपाय करायला हवा. यासाठी आपण सदगुरू श्री वामनराव पै निर्मित पुढील विश्वप्रार्थना सर्वांनी नियमित आणि सातत्याने म्हणायला हवी.
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे!
रात्री १० ते ११ या वेळेत आणि संपर्ू्ण दिवसभरात जेवढं शक्य
होईल तेवढा वेळ ही विश्वप्रार्थना म्हटली तर सर्वांना चांगले आरोग्य नक्कीच लाभेल. त्याचप्रमाणे जर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रार्थना सर्वांनी आपापल्या ओळखीच्या लोकांना पाठवली तर त्यांनादेखील आरोग्याबाबत चांगला विचार मिळेल.