CoronaVirus state government not issued any notification regarding salon and beauty parlours clarifies dgipr kkg | CoronaVirus News: सलून, पार्लरबद्दलची 'ती' अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली नाही; DGIPRचा खुलासा

CoronaVirus News: सलून, पार्लरबद्दलची 'ती' अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली नाही; DGIPRचा खुलासा

मुंबई: राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर्स २९ मेपासून सुरू होणार नसल्याचा खुलासा डीजीआयपीआरनं केला आहे. ठाकरे सरकारनं सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं मेसेज व्हायरल झाला होता. मात्र डीजीआयपीनं याबद्दलचा खुलासा करत तशी कोणतीही सूचना राज्य सरकारनं काढली नसल्याचं स्पष्ट केलं.राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. परवापासून म्हणजेच २९ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे, असा एक मेसेज अधिसूचनेसह सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर्स सुरू करताना पाळाव्या लागणाऱ्या नियमांचादेखील उल्लेख होता. मात्र त्या मेसेजमध्ये तथ्य नसल्याचं डीजीआयपीआरनं म्हटलं आहे. तसं ट्विटदेखील डीजीआयपीआरकडून करण्यात आलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus state government not issued any notification regarding salon and beauty parlours clarifies dgipr kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.