Join us

Coronavirus: धक्कादायक! मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 06:54 IST

नागपाडा, ताडदेव, वरळी, आग्रीपाडा, भायखळा, एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याची जबाबदारी या अधिकाºयावर आहे

मुंबई : राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढत असताना मुंबई मध्य प्रादेशिक विभागातील एका पोलीस उपायुक्तांनाही कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे.

नागपाडा, ताडदेव, वरळी, आग्रीपाडा, भायखळा, एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याची जबाबदारी या अधिकाºयावर आहे. या भागात प्रतिबंधित क्षेत्राचे प्रमाणही अधिक आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्याकडे काम करणाºया काही कर्मचाऱ्यांनाही क्वॉरंटाइन केले आहे. सोमवारी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे आणखी १२ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस