coronavirus: shocking! the Corona patient's PPE kit put in the trash | coronavirus: धक्कादायक! कोरोना रुग्णाचे पीपीई किट टाकले कचऱ्याच्या डब्यात

coronavirus: धक्कादायक! कोरोना रुग्णाचे पीपीई किट टाकले कचऱ्याच्या डब्यात

मुंबई : कोरोना आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कितीही प्रयत्न करत असले तरी नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालाडच्या कोकणीपाड्यात गुरुवारी मृत झालेल्या व्यक्तीचा पीपीई किट कच-याच्या डब्यात फेकण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिकांमध्ये अजूनही याबाबत गांभीर्य नसल्याचे उघड झाले आहे.

मालाडच्या प्रभाग क्रमांक ४३ मध्ये कोकणीपाडा येथील अनमोल हाइट्समध्ये एका व्यक्तीचा गुरुवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्याच्या अंगावर असलेला पीपीई किट इमारतीसमोरील कचरापेटीत फेकण्यात आला. हा किट त्याच्या पत्नीला क्वारंटाइन करण्यासाठी आलेल्या लोकांकडून फेकण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नातेवाइकांकडूनच हा प्रकार करण्यात आल्याचीही चर्चा आहे. कोरोना रुग्णाच्या पीपीई किटची अशा प्रकारे विल्हेवाट करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वापरलेला मास्क, हँडग्लोव्हज आणि पीपीई किट अशा प्रकारे बाहेर न फेकता त्याला वेगळे ठेवण्यात यावे. ‘१९१६’ या क्रमांकावर कळवावे, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून (रहट) तो कचरा वेगळ्या गाडीतून गोळा केला जात आहे. अजूनही बºयाच लोकांना या कचºयाची विल्हेवाट कशी लावायची याबाबत पूर्ण माहिती नसल्याने हे प्रकार घडत आहेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा निष्काळजीपणाने पालिका  कर्मचारी आणि इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालू नये अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

‘जैववैद्यकीय कचºयाबाबत आम्हाला कळवा, माहिती द्या’
आम्ही जैववैद्यकीय कचरा वेगळा गोळा करतो. त्याला रोजच्या कचºयामध्ये मिसळले जात नाही. या कचºयाबाबत पालिकेला नागरिकांनी कळवून सहकार्य करावे.
- संजोग कबरे, सहायक पालिका आयुक्त, पी उत्तर विभाग

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: shocking! the Corona patient's PPE kit put in the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.