Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: धक्कादायक ! २४ तासांत राज्यात ४२४ पोलिसांना कोरोना, ५ जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 04:05 IST

दिवसभरातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या

मुंबई - अनलॉकच्या काळात पोलिसांभोवती कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट वाढत असताना, राज्यात गेल्या २४ तासांत ४२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली, तर पाच पोलिसांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची एकूण संख्या १६३ वर पोहोचली आहे.                   आतापर्यंत दिवसाला तीनशे ते साडेतीनशेचा पल्ला गाठणाऱ्या कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येने मागील २४ तासांत चारशेचा आकडा पार केला. ही आतापर्यंतची दिवसभरातील कोरोनाबाधित पोलिसांची ही सर्वाधिक संख्या आहे. ज्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला त्यात ठाणे, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण, नांदेड आणि वर्धा येथील पोलिसांचा समावेश आहे.     अनलॉकचा फटकाजूनपासून अनलॉक सुरू झाले आणि रहदारी वाढली. रस्त्यावर उभे राहून आॅनड्यूटी २४ तास असणाºया पोलिसांचा नागरिकांशी संपर्क वाढला. त्यामुळे पोलिसांभोवतीचे कोरोना प्रादुर्भावाचे संकट वाढत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांचे म्हणणे आहे.  राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची स्थिती१६,०१५ एकूण रुग्ण१,७३६ अधिकारी१४,२७९ कर्मचारी२,८३८ उपचार सुरू१६३ मृत्यू

 

टॅग्स :पोलिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस