Join us  

coronavirus: "महाराष्ट्र सरकारला अपयशी म्हणणाऱ्या रिकाम्या डोक्यांनी गुजरातच्या अंधार कोठड्या पाहाव्यात’’ सामनामधून भाजपावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 9:02 AM

कोरोनाग्रस्तांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.त्याला प्रत्युत्तर देताना आज सामनामधील अग्रलेखामधून आज थेट गुजरातमधील परिस्थितीवर बोट ठेवण्यात आले आहे.

मुंबई - राज्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून आज पुन्हा एकदा सडकून टीका करण्यात आली आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोनाच्या युद्धात अडथळे आणीत आहेत. या रिकाम्या खोक्यात रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधार कोठड्या पाहायला पाठवायला हवे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात १५ हजारांवर रुग्ण कोरोनावर विजय मिळवून घरी गेले आहेत, तरीही राज्य सरकारला अपयशी ठरवण्याचे  कुटील कारस्थान रचण्यात आले असून, विरोधी पक्ष त्याचा सूत्रधार आहे, असा आरोपही करण्यात आला आहे. 

कोरोनाग्रस्तांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना आज सामनामधील अग्रलेखामधून आज थेट गुजरातमधील परिस्थितीवर बोट ठेवण्यात आले आहे. कोरोनावरील उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील अवस्था अंधारकोठडीपेक्षा भयंकर असल्याचे फटकारे उच्च न्यायालयाने मारले आहेत. याउलट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत जी रुग्णालये उभी केली आहेत. त्या रुग्णालयात विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी आणि एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून, यावे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येईल, असा टोला भाजपा नेत्यांना लगावण्यात आला आहे.

 सरकारविरोधात तोंडाचा ताशा वाजवत  राहायचा. राज्य सरकार कसे अपयशी ठरले आहे व जनता कशी वाऱ्यावर पडली आहे, अशी बदनामी केल्याने ठाकरे सरकार कोलमडेल आणि आपला वनवास संपेल, असे दिवास्वप्न विरोधी पक्ष पाहत आहे. मात्र असे घडण्याची सुतराम शक्यता नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास किमान १४ वर्षांचा असेल, हे आम्ही खात्रीने सांगू शकतो, असा दावाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. भाजपाशासित राज्यातील दुरवस्था पाहिली तर महाराष्ट्राने कोरोनाविरोधात पुकारलेले युद्ध अपयशी ठरणार नाही, असा विश्वासही सामनामधून व्यक्त करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात

पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणासारख्या राज्यात कोरोनाचा कहर आहे. गुजरातला तर न्यायालानेच झापले आहे. मात्र तिथे राज्यपालांनी आढावा बैठका घेतल्याचे दिसत नाही. मग हे महाराष्ट्रातच का घडवले जात आहे. ज्या राज्यात ऑक्सिजन सिलिंडर अभावी दोनशे अर्भक तडफडून मरतात. त्या राज्यात सर्व आलबेल, पण महाराष्ट्रात १५ हजारांवर रुग्ण कोरोनावर विजय मिळवून घरी गेले आहेत, तरीही राज्य   सरकारला अपयशी ठरवण्याचे हे कुटील कारस्थान असून, विरोधी पक्ष त्याचा सूत्रधार आहे, अशी टीकाही या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसशिवसेनाभाजपाराजकारण