Join us  

Coronavirus : 'कोरोना' मृतकांसाठी कब्रस्थानांमध्ये वेगळी व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 9:49 PM

Coronavirus : पालकमंत्र्यांनी दफन व्यवस्थेसंदर्भात सर्व प्रकारचे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही दिली.

मुंबई - 'कोरोना'मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या दफन व्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत 'रझा अकादमी' या संघटनेच्यावतीने साबिर निर्बन यांच्या निवासस्थानी  बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दफन व्यवस्थेसंदर्भात विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.  मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान हे सर्व कब्रस्थानांचा केंद्रबिंदू असेल असे या बैठकीत ठरले. पालकमंत्र्यांनी दफन व्यवस्थेसंदर्भात सर्व प्रकारचे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही दिली. 

बडा कब्रस्तानचे शोएब खतीब यांनी सांगितले की, मुंबई शहरामध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांसाठी बडा कब्रस्थानमध्ये वेगळ्या कबरी  राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अन्य कब्रस्थानांमध्ये देखील अशीच व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. मुंबई बाहेरील शव एलबीएस कब्रस्तान येथे दफन केले जातील. माहिम कब्रस्तानात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांसाठी पुढील २ दिवसांत अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल.

'कोरोना' मृतांचा दफनविधी जलद व्हावा यासाठी सुहैल खंडवानी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यदल स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत झाला. अल्लाहज सईद नूरी यांनी शब ए बारातच्या दिवसांमध्ये घरीच राहण्याचे, सर्व सर्व धार्मिक विधी घरीच करण्याचे व मशीद, कब्रस्थानांमध्ये जाण्यास मनाई असल्याने तेथे न जाण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. बैठकीला हाजी अली व माहिम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी, बाबा कब्रस्थानचे व्यवस्थापक शोएब खतीब, वक्फ बोर्ड ऑफ महाराष्ट्राचे डॉ. लांबे, जामा मशीदचे विश्वस्त हसीब किरकिरे, माहिम कब्रस्तानचे विश्वस्त इम्रान मुजफ्फर खान, साबिर निर्बन, अलहाज सहिद नुरी आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...म्हणून 'या' डॉक्टरने कारमध्ये थाटलंय घर, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

Coronavirus : 'अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल, लोकांचे जीव गेले तर ते परत कसे आणणार?'

Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईकोरोना वायरस बातम्यामृत्यूभारत