Coronavirus : दुबईतून आलेल्या ‘त्या’ २५ संशयितांमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 04:35 AM2020-03-23T04:35:23+5:302020-03-23T04:54:08+5:30

coronavirus : अबुधाबीवरून २१ आणि २२ मार्च रोजी हे संशयित रुग्ण मुंबईत आले आहेत. त्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी त्यांची कागदपत्रे, तसेच सर्व तपशील नोंदवून घेतला आहे.

Coronavirus: Sensation of 'those' 25 suspects from Dubai | Coronavirus : दुबईतून आलेल्या ‘त्या’ २५ संशयितांमुळे खळबळ

Coronavirus : दुबईतून आलेल्या ‘त्या’ २५ संशयितांमुळे खळबळ

Next

मुंबई : फोर्ट विभागातील एका गेस्ट हाउसमध्ये दुबईवरून आलेले २५ संशयित कोरोना रुग्ण असल्याचे सांगत त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. मात्र ते संशयित नसून त्यांना होम क्वारंटाइन म्हणजे घरगुती अलगीकरण केल्याचे सांगण्यात आले.
अबुधाबीवरून २१ आणि २२ मार्च रोजी हे संशयित रुग्ण मुंबईत आले आहेत. त्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी त्यांची कागदपत्रे, तसेच सर्व तपशील नोंदवून घेतला आहे. पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी या व्हिडीओबाबत सांगितले, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांकड़ून विविध गेस्ट हाउसमध्ये थांबलेल्या परदेशी नागरिकांची तपासणी सुरू आहे. याच तपासणी दरम्यान एमआरए मार्ग पोलिसांच्या तपासणी दरम्यान फोर्ट येथील एका गेस्ट हाउसमध्ये ही मंडळी दिसून आली. तपासणीत ते कोरोना संशयित नसले तरी १४ दिवसांसाठी त्यांना घरगुती अलगीकरण म्हणून सांगितले आहे. त्यानुसार पुढील धोका टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे आणखीन कुठे परदेशी नागरिक आहेत याबाबत पोलिसांकड़ून झाडाझडती सुरू आहे.

मुंबईतील ६४ वर्षीय महिलाही संपर्कामुळे कोरोनाबाधित
शहरातील ६४ वर्षीय महिलेला रुग्ण वा रुग्णांच्या आलेल्या व्यक्तींच्या संपर्कामुळे कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. ही महिला सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

Web Title: Coronavirus: Sensation of 'those' 25 suspects from Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.