coronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 12:21 PM2020-04-01T12:21:55+5:302020-04-01T12:22:27+5:30

मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

coronavirus: sealing 140 residents of Mumbai due to corona virus BKP | coronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील

coronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील

Next

मुंबई -  कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले 140 रहिवासी भाग सील केले आहेत. दरम्यान, अशाच प्रकारची कारवाई नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली येथेही करण्यात आली आहे. 

गेल्या दोन दिवसात मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. त्यामुळे या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. काल वरळी कोळीवाडा येथील परिसरात कोरोनाचे काही संशयित सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. तर गोरेगावमधील बिंबिसारनगर हा परिसरसुध्दा कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर लॉक करण्यात आला होता. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत सुमारे 140 रहिवासी भाग सील करण्यात आले आहेत. 

मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या शहरातील काही भागसुद्धा सील करण्यात आले आहेत.

Web Title: coronavirus: sealing 140 residents of Mumbai due to corona virus BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.