Join us

coronavirus : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची राज्यपालांशी दुसऱ्यांदा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 15:52 IST

करोना व्हायरस उद्रेकामुळेउद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासंबंधी राज्य आणि केंद्र शासनातर्फे केल्या जातअसलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

मुंबई - करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीउपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचेसह विविध राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपालव केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांचेसोबत आज (दि. ३) दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.  करोना व्हायरस उद्रेकामुळेउद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासंबंधी राज्य आणि केंद्र शासनातर्फे केल्या जातअसलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.  या चर्चेमध्ये राज्यपालभगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन, मुंबई येथून सहभाग घेतला. यापूर्वी राष्ट्रपतींनीदिनांक २७ मार्च रोजी सर्व राज्यपालांशी चर्चा केली होती.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र