Join us

coronavirus: दिल्ली, मुंबईसह गुवाहाटीत प्लाझ्मा बँक, वैद्यकीय विद्यार्थी ठरला पहिला दाता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 02:56 IST

वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले डॉ. लिखितेश हे या बँकेचे पहिला प्लाझ्मादाता ठरले. ते कोरोना संसर्गातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले होते.

गुवाहाटी : कोरोना साथीशी लढा देण्याकरिता दिल्लीनंतरआसामनेही शुक्रवारपासून प्लाझ्मा बँक सुरू केली आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले डॉ. लिखितेश हे या बँकेचे पहिला प्लाझ्मादाता ठरले. ते कोरोना संसर्गातून उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले होते.प्लाझ्मा दान केल्याबद्दल डॉ. लिखितेश यांचे तसेच प्लाझ्मा बँकेत काम करणाऱ्यांचे योगदानाबद्दल आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिश्वा सरमा यांनी आभार मानले. कोरोना संसर्गातून बरे झालेले रुग्ण या बँकेत प्लाझ्माचे दान करण्यास पुढे येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आरोग्य राज्यमंत्री पीजूष हजारिका यांनी सांगितले, डॉ. लिखितेश यांच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. कोरोनाचा संसर्ग असतानाही खचून न जाता कठीण काळातही ते इतर रुग्णांना मार्गदर्शन करत होते. आसाममध्ये २४ तासांत ३६५ नवे रुग्ण आढळून आल्याने तेथील बाधितांची संख्या आता ९७००वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमध्ये गुवाहाटीतील १३४ जणांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)चाचण्या वाढवागुवाहाटीमध्ये लॉकडाऊन असून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. गुवाहाटीमध्ये दररोज कोरोनाच्या १० हजार चाचण्या कराव्यात, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमंत बिश्व सरमा यांना केली होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतदिल्लीमुंबईआसाम