coronavirus: The number of people not wearing masks has increased in Mumbai | coronavirus: मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले

coronavirus: मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले

मुंबई : कोरोनाच्या संकटातही सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीबरोबरच मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण मुंबईत वाढत आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांत मास्क न लावता वावरणा-यांविरुद्ध तब्बल ३ हजार ९०० गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात उत्तर विभागाची आघाडी कायम आहे. मुंबईसह राज्यभरात नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध पोलिसांकड़ून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत मुंबईत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ हजार ८६२ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत कोरोना रुग्णांसंदर्भात १०२, हॉटेल / आस्थापना संबंधित १६६, पानटपरी ७६, इतर दुकाने ९७५ तसेच अवैध वाहतूक प्रकरणी १,८५९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दीप्रकरणी ७ हजार ६९२ गुन्हे नोंद आहेत. यात उत्तर विभागातील २ हजार ८९५ गुन्ह्यांचा सामावेश आहे. यापाठोपाठ मास्क न वापरणा-यांविरुद्ध ३ हजार ९०० गुन्हे नोंद आहेत. यातही उत्तर विभागाची आघाडी कायम आहे. तर पश्चिम, मध्य आणि पूर्व प्रादेशिक विभागाअंतर्गत प्रत्येकी ५०० हून अधिक गुन्हे नोंद आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: The number of people not wearing masks has increased in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.