Coronavirus: बेस्टमधील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढला; ४९ बाधित तर तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 08:12 IST2020-05-07T08:11:45+5:302020-05-07T08:12:06+5:30

लॉकडाउन सुरू झाल्यापासून बेस्ट उपक्रमातील ८८६५ कामगारांची तपासणी करण्यात आली

Coronavirus: The number of coronavirus employees in BEST has increased; 49 affected and three killed | Coronavirus: बेस्टमधील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढला; ४९ बाधित तर तिघांचा मृत्यू

Coronavirus: बेस्टमधील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढला; ४९ बाधित तर तिघांचा मृत्यू

मुंबई : बेस्ट उपक्रमातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत ४९ कर्मचाºयांना कोरोनाची
लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला असून तर सहा कर्मचाºयांची प्रकृती गंभीर आहे. तर, ११ कर्मचारी बरे झाले आहेत.

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेली बेस्ट सेवा लॉकडाउनच्या काळातही रस्त्यावर आहे. दररोज थेट जनतेशी संपर्क येत असल्याने बेस्टच्या कर्मचाºयांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. मंगळवारपर्यंत ४९ कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये वाहन चालक आणि वाहकांची संख्या अधिक आहे. मात्र चालक आणि वाहकांचा दररोज लोकांशी संपर्क येत असल्याने या कर्मचाºयांमध्ये अस्वस्थता आहे.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून बेस्ट उपक्रमातील ८८६५ कामगारांची तपासणी करण्यात आली. यापैकी पाच हजार कर्मचाºयांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तर हायरिस्क गटातील दीड हजार लोकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून चारशे कर्मचाºयांना होमक्वारंटाइन केल्याचे बेस्टमधील सूत्रांकडून समजते. मंगळवारी आणखी दोन कर्मचाºयारी बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Web Title: Coronavirus: The number of coronavirus employees in BEST has increased; 49 affected and three killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.