CoronaVirus News: अबब! राज्यात दिवसभरात १०,५७६ रुग्ण; एक लाख ३६ हजार जणांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:30 AM2020-07-23T01:30:19+5:302020-07-23T06:43:03+5:30

मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी तर दहा हजारांचा टप्पा ओलांडला.

CoronaVirus News:10,576 patients per day in the state; One lakh 36 thousand people are undergoing treatment | CoronaVirus News: अबब! राज्यात दिवसभरात १०,५७६ रुग्ण; एक लाख ३६ हजार जणांवर उपचार सुरू

CoronaVirus News: अबब! राज्यात दिवसभरात १०,५७६ रुग्ण; एक लाख ३६ हजार जणांवर उपचार सुरू

Next

मुंबई : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून बुधवारी दिवसभरात तब्बल १० हजार ५७६ रुग्णांची नोंद तर २८० कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांत राज्यातील दैनंदिन रुग्णांच्या नोंदीत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी तर दहा हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ हजार ५६६ मृत्यू झाले आहेत. तर १ लाख ३६ हजार ९८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रु

ग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के झाले आहे. मात्र, राष्ट्रीय दराहून हे प्रमाण साडे सात टक्क्यांहून कमीच आहे. दिवसभरात ५ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: CoronaVirus News:10,576 patients per day in the state; One lakh 36 thousand people are undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.