CoronaVirus News : चिंताजनक! राज्याच्या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 03:54 IST2020-11-01T03:53:44+5:302020-11-01T03:54:11+5:30
CoronaVirus News : राज्याच्या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक असल्याने हे प्रमाण कमी करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.

CoronaVirus News : चिंताजनक! राज्याच्या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक
मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होतेय. यात दररोजच्या रुग्णनिदानाची संख्या राज्यात ५ हजारांच्या घरात तर मुंबईत हजारांच्या आत आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राज्याचा मृत्युदर २.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे तरीही मुंबईत कोरोना बळींचे प्रमाण अधिक असल्याने हा मृत्युदर ३.९९ टक्के आहे. परिणामी, राज्याच्या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक असल्याने हे प्रमाण कमी करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानामुळे अतिजोखमीच्या वा सहवासितांचा शोध घेण्यास प्रशासनाला मदत होते आहे.
महापालिकेसमोर आव्हान
मुंबईत कोरोना बळींचे प्रमाण अधिक असल्याने हा मृत्युदर ३.९९ टक्के आहे. परिणामी, राज्याच्या तुलनेत मुंबईचा मृत्युदर अधिक असल्याने हे प्रमाण कमी कऱण्याचे आव्हान आहे.
कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र अजूनही रुग्ण उशिराने उपचार प्रक्रियेत येत असल्याने मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासन काम करीत आहे. शोध, निदान आणि उपचार या त्रिःसूत्रीनुसार शहर उपनगरात काम सुरू आहे. त्यामुळे सण-उत्सवानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे.
- सुरेश काकाणी
अतिरिक्त आयुक्त, महापालिका