Join us

Coronavirus News: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 13:44 IST

Varsha Raut Corona News: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Varsha Raut Corona News: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वर्षा राऊत यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पत्नीला कोरोनाची लागण झाल्यामुळे संजय राऊत यांचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याचं समजतं. 

वर्षा राऊत यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप, सर्दी आणि खोकला होता. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. 

टॅग्स :संजय राऊतकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस