CoronaVirus News : कोरोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:44 AM2020-08-17T04:44:41+5:302020-08-17T04:45:12+5:30

राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या ५ लाख ९५ हजार ६८५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर एकूण २० हजार ३७ मृत्यू झाले आहेत. मृत्युदर ३.३६ टक्के आहे.

CoronaVirus News : The number of corona patients is close to six lakh and the cure rate is 70 per cent | CoronaVirus News : कोरोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

CoronaVirus News : कोरोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर

Next

मुंबई : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाच महिन्यांनंतर ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात दिवसभरात ११ हजार १११ रुग्ण आढळले असून २८८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर आली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या ५ लाख ९५ हजार ६८५ रुग्णांची नोंद झाली आहे, तर एकूण २० हजार ३७ मृत्यू झाले आहेत. मृत्युदर ३.३६ टक्के आहे.
सध्या १ लाख ५८ हजार ३९५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात रविवारी ११ हजार १११ रुग्णांचे निदान झाले तर २८८ मृत्यू झाले. दिवसभरात नोंद झालेल्या २८८ मृत्यूंमध्ये मुंबई ४७, ठाणे २, ठाणे मनपा ६, नवी मुंबई मनपा ३, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा ७, भिवंडी- निजामपूर मनपा ७, मीरा-भार्इंदर मनपा ८, पालघर १, वसई-विरार मनपा ३, रायगड ५, पनवेल मनपा १, नाशिक २, नाशिक मनपा ६, अहमदनगर १, अहमदनगर मनपा ९, धुळे ७, धुळे मनपा २, जळगाव ७, पुणे १२, पुणे मनपा ३२, पिंपरी-चिंचवड मनपा १९, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा ८, कोल्हापूर २९, कोल्हापूर मनपा ७, सांगली ४, सांगली-मिरज कुपवाड मनपा ९, रत्नागिरी ३, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, परभरणी मनपा १, लातूर १, उस्मानाबाद २, बीड १, नांदेड ३, अकोला १, अकोला मनपा १, अमरावती मनपा २, बुलडाणा ३, नागपूर ३, नागपूर मनपा १३, भंडारा १, गोंदिया १, चंद्रपूर १ आणि अन्य राज्य-देशातील एका रुग्णाचा समावेश आहे.
सध्या राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ३८ हजार २०३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Web Title: CoronaVirus News : The number of corona patients is close to six lakh and the cure rate is 70 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.