CoronaVirus News : अधिक बिल घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिकेचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:51 AM2020-06-23T00:51:56+5:302020-06-23T00:52:16+5:30

मूळ आकारणीचा विचार करता सुमारे १५ टक्क्यांनी बिलाची रक्कम कमी झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

CoronaVirus News : Municipalities hit private hospitals with higher bills | CoronaVirus News : अधिक बिल घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिकेचा दणका

CoronaVirus News : अधिक बिल घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना महापालिकेचा दणका

Next

मुंबई : कोरोना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारले जात असल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या तक्रारी वाढत असतानाच यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयांसाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली. त्यानंतर आजपर्यंत २६ रुग्णालयांतील १३४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. आणि एकूण २३ लाख ४२ हजार रुपयांनी बिलाची रक्कम कमी झाली आहे. मूळ आकारणीचा विचार करता सुमारे १५ टक्क्यांनी बिलाची रक्कम कमी झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेने खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांवर उपचार घेणाºया रुग्णांकडून निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी करणे गरजेचे आहे. मात्र खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत आहेत. परिणामी यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी करण्यात आली. खासगी रुग्णालयांबाबत तक्रार करावयाची असल्यास त्यासाठीचा पर्याय उपलब्ध आहे. अधिकाºयाकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदविता येते. महानगरपालिकेकडे प्राप्त होत असलेल्या अशा तक्रारींपैकी अंदाजे ४० टक्के तक्रारी या शासनाने खासगी रुग्णालयांचे दरनिश्चितीबाबत निर्गमित केलेल्या आदेशापूर्वीच्या आहेत.
>२६ रुग्णालयांतील १३४ तक्रारींचा निपटारा
२६ रुग्णालयांतील १३४ तक्रारी निकालात काढण्यात आल्या.
तक्रारींमधील मूळ आकारणीची एकूण रक्कम १ कोटी ६१ लाख ८८ हजार ८१९ रुपये होती.
ही रक्कम १ कोटी ३८ लाख ४६ हजार ७०५ रुपयांपर्यंत कमी झाली.
म्हणजेच एकूण २३ लाख ४२ हजार ११४ रुपयांनी आकारणीची रक्कम कमी झाली.
तक्रारी मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत त्यांचे निराकरण करण्यात आले.
उर्वरित तक्रारींचेही लेखापरीक्षण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Web Title: CoronaVirus News : Municipalities hit private hospitals with higher bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.