Join us  

CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचे बळी रोखण्यासाठी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी', मृत्यूचे फॉरेन्सिक ऑडिट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 2:14 PM

त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 

मुंबईत कोरोनाचे बळी जाण्यापासून रोखण्यासाठी सेव्ह लाइव्ह स्ट्रॅटेजी राबवण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूचे फॉरेन्सिक ऑडिट होणार असल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईत आतापर्यंत 4461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर आणि अति गंभीर रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जावेत. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. रुग्णाच्या प्रकृतीबाबत वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांनी दिवसातून दोन वेळा व्हिडिओ किंवा दूरध्वनीवरून चर्चा करावी. रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान रुग्ण ऑक्सिजन काढून शौचालयात जाण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी अनेक रुग्ण कोसळून पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णांना बेडवरच पॉट देण्यात यावे, असे आदेशही आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार कोरोना मृतांचा आकडा लपवत असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला होता. त्यानंतर चौकशीअंती मुंबईतल्या मृतांच्या आकडेवारीतही तफावत आढळून आली होती. त्यावेळी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांना अचूक आकडेवारी द्या, अन्यथा कारवाई  करू, असा इशाराही दिला होता. 

हेही वाचा

मोदी सरकारच्या दणक्यानंतर चीनचा पलटवार; भारताच्या मीडिया वेबसाइट्स अन् VPN ब्लॉक

चिनी अ‍ॅपवर बंदी घालणं योग्यच, पण टिक-टॉकवरील बंदीमुळे...; संजय निरुपम यांची वेगळीच खंत

देशभरात चिनी अ‍ॅप्स बंद करण्यासाठी आता दूरसंचार कंपन्या उचलणार मोठं पाऊल!

चीनचे ५९ अ‍ॅप बंद केल्यानं काय बदलणार अन् भारताला कसं नुकसान होणार?, जाणून घ्या...

पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला

आजचे राशीभविष्य - 30 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनाचा लाभ होणार

बंपर भरती! 'या' कंपन्या भारतात देणार ४० हजारांहून जास्त रोजगार, जाणून घ्या...

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस