CoronaVirus News in Mumbai : मुंबईत कोरोनाचे आणखी ४१ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 05:37 IST2020-05-21T05:36:48+5:302020-05-21T05:37:37+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी २४ विभागांमध्ये घरोघरी दाखल होत तपासणी केली जात आहे.

CoronaVirus News in Mumbai : 41 corona victims in Mumbai | CoronaVirus News in Mumbai : मुंबईत कोरोनाचे आणखी ४१ बळी

CoronaVirus News in Mumbai : मुंबईत कोरोनाचे आणखी ४१ बळी

मुंबई : मुंबईत बुधवारी कोरोनामुळे ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १५ मृत्यू ६ मे ते १५ मे दरम्यानचे आहेत.
मृत रुग्णांपैकी ३२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील २९ रुग्ण पुरुष होते. १२ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० वर्षाखाली होते.
तर, १८ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २२ रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते.
दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी २४ विभागांमध्ये घरोघरी दाखल होत तपासणी केली जात आहे. १ हजार पथके मिळून ६ ते ७ लाख लोकांपर्यंत पोहचत आहेत. आतापर्यंत ५८ लाख १४ हजार ३४० घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले.

Web Title: CoronaVirus News in Mumbai : 41 corona victims in Mumbai