Join us

CoronaVirus News: कोरोनाशी लढणारा महाराष्ट्र नक्कीच जिंकणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:55 IST

आर्थिक चाक रुतले आहे, अडचणी वाढल्या आहेत. हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते.

मुंबई : महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आणि महाराष्ट्रच यात जिंंकणार आहे. या विषाणुमुळे राज्य संकटात आले आहे. आर्थिक चाक रुतले आहे, अडचणी वाढल्या आहेत. हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते. हे सैनिक वाचले तर त्यांच्या सहकार्याने या अडचणींवर आपण नक्कीच मात करू शकतो आणि करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुकद्वारे संवाद साधताना व्यक्त केला.परराज्यातील नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठवण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. राज्या-राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल. याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल. परंतु त्यासाठी गर्दी करू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.>आठवणींना उजाळा; वांद्रे-कुर्ला संकुलात कोविड रुग्णांसाठी रुग्णालयमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करायाचा होता, परंतु आजच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच अनेक आठवणींना उजाळा दिला. राज्य स्थापनेच्या ५० व्या वर्धापनदिनी वांद्रा-कुर्ला संकुलातील कार्यक्रमाला लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ या गाण्याची आज आठवण येते, असे सांगतानाच आज याच वांद्रे-कुर्ला संकुलात कोविड रुग्णांसाठी रुग्णालय सुरू होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :उद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस