CoronaVirus News : आवाजावरून चाचणीसाठी अजूनही किमान नमुन्यांची पूर्तता नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 04:33 IST2020-09-15T04:33:35+5:302020-09-15T04:33:59+5:30
आवाजावरून करण्यात येणारी ही चाचणी अत्यंत कमी वेळात होईल. कोरोनाच्या अँटिजन चाचणीलाही अर्ध्या तासाचा वेळ लागतो, मात्र आवाजाच्या चाचणीचा अवघ्या ३० सेकंदांत अहवाल येईल.

CoronaVirus News : आवाजावरून चाचणीसाठी अजूनही किमान नमुन्यांची पूर्तता नाही
मुंबई : आवाजावरून कोरोना रुग्ण ओळखण्याच्या प्रयोगासाठी गोरेगाव येथील नॅस्को कोविड केंद्रातून १०० नमुने गोळा केले आहेत. मात्र अजूनही या अॅपमध्ये संकलनासाठी ५०० नमुन्यांची आवश्यकता आहे.
आवाजावरून करण्यात येणारी ही चाचणी अत्यंत कमी वेळात होईल. कोरोनाच्या अँटिजन चाचणीलाही अर्ध्या तासाचा वेळ लागतो, मात्र आवाजाच्या चाचणीचा अवघ्या ३० सेकंदांत अहवाल येईल.
आवाजावरून कोरोना रुग्ण शोधण्यासाठी ‘वोकालिस हेल्थ’ने अभ्यास सुरू केला आहे. दोन टप्प्यांतील अभ्यासासाठी १० हजार नमुने गोळा केले जातील. त्यापैकी दोन हजार नमुने मुंबईतील कोरोना संशयितांचे असतील. पहिल्या टप्प्यात एआयचा वापर करून ५०० नमुने संकलित करून विश्लेषण केले जाईल. जे विशिष्ट ध्वनी तरंग अवघ्या ३० सेकंदांत रुग्णांना शोधण्यासाठी मदत करतील. यातून संशोधक विशिष्ट आवाजाचा तरंग निष्कर्ष नक्की करतील. ज्यामुळे रुग्ण शोधण्यात मदत होईल.
प्रतीक्षा करावी लागेल
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर आधारित आहे. कोरोना रुग्ण ओळखण्यास ‘व्हॉईस बायोमार्कर्स’चा वापर पहिल्यांदाच केला. तंत्रातील परिणामकारकता मोजण्यासाठी अभ्यासाची प्रतीक्षा करावी लागेल, असे नेस्को कोविड केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षिका
डॉ. नीलम अंद्राडे म्हणाल्या.