CoronaVirus News: मृतांची माहिती देण्याची शेवटची संधी, कारवाई करण्याचा खासगी रूग्णालयांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:54 AM2020-06-27T00:54:37+5:302020-06-27T00:55:18+5:30

व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगद्वारे आयोजित एका बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी असे आदेश दिले आहेत.

CoronaVirus News: Last chance to inform the dead, warning private hospitals to take action | CoronaVirus News: मृतांची माहिती देण्याची शेवटची संधी, कारवाई करण्याचा खासगी रूग्णालयांना इशारा

CoronaVirus News: मृतांची माहिती देण्याची शेवटची संधी, कारवाई करण्याचा खासगी रूग्णालयांना इशारा

Next

मुंबई : खाजगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित मृतांची आकडेवारी दिली जात नसल्याने महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले होते. याची गंभीर दखल घेऊन २९ जून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मृतांची आकडेवारी सादर करण्याची अंतिम ताकीद महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानंतरही कोरोना मृतांची माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवर यापुढे ‘साथरोग नियंत्रण कायदा १८९७’ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगद्वारे आयोजित एका बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी असे आदेश दिले आहेत.
कोरोनामुळे आतापर्यंत चार हजार ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खाजगी रुग्णालयांकडून माहिती संकलित करण्याची जबाबदारी सर्व २४ प्रशासकीय आयुक्तांवर सोपविण्यात आली होती. परंतु काही खाजगी रुग्णालये ४८ तासांच्या मुदतीनंतरही माहिती कळवत नसल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. आयुक्तांनी अशा रुग्णालयांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.
औषधांचा साठा ठेवा
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये, उपचार केंद्रांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांसाठी टोसिलिझुमॅब, रेम्डेसिव्हिर यासारख्या आवश्यक त्या औषधांचा महिन्याभरासाठीचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. आवश्यकतेनुसार संबंधित औषधे तयार करणाºया उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून थेटपणे औषधांची उपलब्धता करून घ्याव्या, असेही आयुक्तांनी कळविले आहे.
।तब्बल पाचशेहून अधिक मृतांची आकडेवारी महापालिकेच्या यादीत नाही, असा आरोप भाजपने केला होता.

Web Title: CoronaVirus News: Last chance to inform the dead, warning private hospitals to take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.