CoronaVirus News: Health study of four infected doctors in Mumbai | CoronaVirus News : संसर्ग झालेल्या मुंबईतील चार डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास

CoronaVirus News : संसर्ग झालेल्या मुंबईतील चार डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास

मुंबई : मुंबईसह दिल्लीत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा उद्भवत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांचा अभ्यास करून त्याविषयी महत्त्वाची निरीक्षणे मांडली. दिल्लीत नोएडातील दोन डॉक्टर, मुंबई नायर रुग्णालयातील तीन डॉक्टर व हिंदुजा रुग्णालयातील संसर्ग झालेल्या एका डॉक्टरचा यात समावेश आहे.
अभ्यास अहवाल नुकताच दिल्लीतील इन्स्टिट्यूट आॅफ जिओनॉमिक्स अ‍ॅण्ड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी काऊन्सिल आॅफ इंडस्ट्रीअल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेला सादर करण्यात आला आहे. या लॅबोरेटरीचे संस्थापक डॉ. अनुराग अगरवाल म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांत पुन्हा आढळणारा कोरोना संसर्गाचा अभ्यास केला, याकरिता या रुग्णांच्या पहिल्या संसर्गातील स्वॅबचे नमुने आणि दुसºया वेळी झालेल्या संसर्गातील स्वॅबचे नमुने गोळा करण्यात आले.
रुग्णांमध्ये पुन्हा उद्भवणारा कोरोनाचा संसर्ग देशपातळीवर अल्प प्रमाणात प्रमाणित करण्यात आला आहे. आपल्याकडे पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मीळ आहे. दोन्ही वेळचे नमुने तपासले असता दोनदा झालेल्या संसर्गात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. जागतिक स्तरावरही आॅगस्ट महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्गाची प्रकरणे समोर आली. त्याविषयी विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे, त्याचाही आधार स्थानिक अभ्यासात घेण्यात येईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Health study of four infected doctors in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.