CoronaVirus News : जिल्हानिहाय कोरोना स्थितीचा होणार अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 01:46 AM2020-11-05T01:46:39+5:302020-11-05T06:47:36+5:30

CoronaVirus News : सक्रिय रुग्णांचा भार कमी झाल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले होते.

CoronaVirus News: District wise corona status study to be done | CoronaVirus News : जिल्हानिहाय कोरोना स्थितीचा होणार अभ्यास

CoronaVirus News : जिल्हानिहाय कोरोना स्थितीचा होणार अभ्यास

Next

- स्नेहा मोरे

मुंबई : परदेशात नियंत्रणात आल्यानंतर आता कोरोनाच्या संसर्गाची नवी लाट आली आहे. त्याचप्रमाणे, राज्यातही पुन्हा रुग्णवाढीचा धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा कोविड वाढीच्या स्थितीचा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून १ डिसेंबरपर्यंत राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील कोविडच्या चढ-उताराच्या स्थितीचा अभ्यास करण्यात येईल.
या अभ्यासाद्वारे जिल्ह्यातील कोविडसंबंधित पायाभूत सेवा-सुविधा वाढविण्याचा विचार करण्यात येईल.
सक्रिय रुग्णांचा भार कमी झाल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले होते. ऑगस्ट पंधरवड्यानंतर ते सप्टेंबर अखेरीस प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत १० टक्क्यांनी प्रमाण वाढवून आम्ही सर्व जिल्ह्यांच्या स्थितीचा आढावा घेत आहोत. या माध्यमातून तेथील कोविड केंद्र, सेवा, ऑक्सिजन पुरवठा - मागणी हे सर्व मुद्दे यात पडताळण्यात येणार  आहेत. 

Web Title: CoronaVirus News: District wise corona status study to be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.