CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 06:56 IST2020-11-08T02:31:32+5:302020-11-08T06:56:56+5:30
दिवसभरात ६ हजार ७४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के
मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार ९५९ नवीन कोरोना रुग्ण आणि १५० मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १७ लाख १४ हजार २७३ इतका झाला आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.५३ टक्क्यांवर पोहोचला असून, मृत्युदर २.६३ टक्के आहे. आतापर्यंत १५ लाख ६९ हजार ९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरात ६ हजार ७४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १० लाख ७१ हजार १६३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ९ हजार ७९९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आता राज्यात ९९ हजार १५१ सक्रिय रुग्ण आहेत. पुणे, मुंबई आणि ठाणे येथे अजूनही कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांपेक्षा अधिक आहे.