Join us

CoronaVirus New: अशोक चव्हाण पुढील उपचारासाठी मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 06:37 IST

मंत्री चव्हाण हे दोन दिवसांपूर्वी मुंबईहून नांदेडला परतले होते. मात्र त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.

नांदेड /मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी ते मुंबईत दाखल झाले असून सोमवारी रात्री उशीरा त्यांना ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंत्री चव्हाण हे दोन दिवसांपूर्वी मुंबईहून नांदेडला परतले होते. मात्र त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुगणालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. सोमवारी सकाळी ते अ‍ॅम्बुलन्समधून मुंबईकडे रवाना झाले. ते रात्री उशीरा मुंबईत पोहोचल्यानंतर ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती स्थिर असून कोरोनाची तीव्र लक्षणे नाहीत, मात्र खबरदारी म्हणून त्यांना मुंबईला हलविण्यात आल्याचे त्यांच्या समवेत असलेले डॉ़ अंकुश देवसरकर यांनी सांगितले़ सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसअशोक चव्हाण