CoronaVirus News: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 06:35 IST2020-05-24T02:10:54+5:302020-05-24T06:35:55+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते.

CoronaVirus News: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावत आहेत. मात्र या लोकलमध्ये गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने आता या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठीच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होते. लोकल संख्या कमी आणि रेल्वे कर्मचारी जास्त असल्याने अनेक जण गर्दीत कसेबसे उभे राहून प्रवास करत होते. साहजिकच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती होती. यासंदर्भात व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता मध्य रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार लोकलचे नियोजन करण्याचे ठरवले.
आता पश्चिम रेल्वे मार्गावरही धावणार १४ लोकल
मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वे मार्गावर १४ विशेष लोकल धावणार आहेत. या लोकल फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असतील. विरार ते चर्चगेट दरम्यान या लोकल चालविण्यात येतील.