Join us  

Coronavirus News: "घरात बसून मुंबईचं चित्र भयावह नाहीच वाटणार; जरा बाहेर फिरा!"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 5:48 PM

राज्याच्या राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस विरुद्ध जयंत पाटील, आशीष शेलार विरुद्ध सचिन सावंत असे सामने रंगल्याचं चित्र आहे.

ठळक मुद्देराज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे.भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

कोरोनाचं संकट, मुंबईत वाढणारा रुग्णांचा आकडा, स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीचा मुद्दा, केंद्राने दिलेल्या पॅकेजचा विषय, यावरून गेले काही दिवस राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस विरुद्ध जयंत पाटील, आशीष शेलार विरुद्ध सचिन सावंत, अधून-मधून संजय राऊत यांची फटकेबाजी, असे सामने रंगल्याचं चित्र आहे. त्यात, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

कोरोनाविषयी मुंबई परिसरातील जे भयावह चित्र उभे केले जात आहे ते अनाठायी असून आम्ही प्रयत्नपूर्वक कोरोना विषाणूला नियंत्रणात नक्की आणू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी संपादकांशी संवाद साधताना केला होता. महानगर परिसरात ३१ मेपर्यंत दीड लाख लोकांना कोरोना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात आजचे आकडे तुलनेने खूप कमी आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं होतं. या संदर्भात ‘लोकमत’ची बातमी ट्विट करत, अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

‘‘घरात बसून मुंबईचे चित्र भयावह नाही असे वाटणे स्वाभाविक आहे. जरा बाहेर फिरा, किमान लोकांचे फोन तरी उचला म्हणजे समजेल बाहेर काय स्थिती आहे ते. ICMR ने मुंबईबाबत कोणतीही आकडेवारी दिली नसताना त्या आधारावर खोटारडे विधान करणे हे निबरपणाचे लक्षण आहे मुख्यमंत्री महोदय’’, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 

कोरोना संकटाच्या काळात उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत, असा विरोधकांचा आक्षेप आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी थेट काही उत्तर दिलेलं नाही.

आणखी वाचाः 

राज्यात सरकारकडून फेकाफेकी, आकड्यांचा घोळ; देवेंद्र फडणवीस यांची टीका

'महाराष्ट्रातील तरुणांना अंडरइस्टीमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय'

प्रत्यक्ष खर्च अन् कर्जाचे आकडे सादर करा! : पृथ्वीराज चव्हाण

फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा

शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेअतुल भातखळकरशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस