CoronaVirus News : कोरोनावर बीसीजी लस परिणामकारक, श्वसनाच्या त्रासावर उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:29 AM2020-11-06T02:29:16+5:302020-11-06T06:50:40+5:30

BCG vaccine : बीसीजीची ही लस अनेक दशकांपासून क्षयरोग प्रतिबंधक म्हणून लहान मुलांना देण्यात येते. या लसीचा कोरोनाच्या रुग्णांवर काही परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी या दोन संस्थांच्या संयुक्त संशोधन गटाने अभ्यास केला.

CoronaVirus News : The BCG vaccine is effective on corona, useful in respiratory distress | CoronaVirus News : कोरोनावर बीसीजी लस परिणामकारक, श्वसनाच्या त्रासावर उपयुक्त

CoronaVirus News : कोरोनावर बीसीजी लस परिणामकारक, श्वसनाच्या त्रासावर उपयुक्त

googlenewsNext

मुंबई :  कोविडच्या रुग्णाला श्वसनाला अडचण येत असेल तर त्यावर बीसीजी लसीचा वापर करता येऊ शकेल असे एका संशोधनातून समोर आले आहे. परेलच्या हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने यासंदर्भात संशोधन केले. त्यात क्षयरोगावर वापरण्यात येणाऱ्या बीसीजी लसीचा डोस कोरोनाच्या रुग्णाला दिला असता त्याची श्वसनाची अडचण दूर होते.
बीसीजीची ही लस अनेक दशकांपासून क्षयरोग प्रतिबंधक म्हणून लहान मुलांना देण्यात येते. या लसीचा कोरोनाच्या रुग्णांवर काही परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी या दोन संस्थांच्या संयुक्त संशोधन गटाने अभ्यास केला. या संशोधनासाठी ६० अशा कोरोना रुग्णांना बीसीजी लस देण्यात आली, ज्यांना न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास होत होता. त्यापैकी अर्ध्या रुग्णांची श्वसनाची समस्या तीन ते चार दिवसांत कमी झाली. या रुग्णांपैकी कुणाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. परंतु ज्यांना या लसीचा डोस दिला नाही अशा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. या संशोधनाची अजून इतर तज्ज्ञांकडून खातरजमा व्हायची आहे, पण ज्यांना बीसीजीची ही लस देण्यात आली आहे त्यांच्या शरीरात प्रतिकारक शक्तीची वाढ झाल्याचे मत संशोधकांनी नोंदवले.

रोगप्रतिकारशक्तीत वाढ
कोरोना रुग्णाला बीसीजी लस देणे हे अत्यंत सुरक्षित आहे. कोरोना रुग्णाला देण्यात येणाऱ्या स्टँडर्ड औषधांच्या सोबत याचा वापर केल्यास फायदा होईल. रुग्णाला आधी श्वसनाचा त्रास होत होता त्याचा त्रास तीन ते चार दिवसांत कमी झाला आणि न्युमोनियाही गतीने बरा झाला. सोबत 
रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्याचेही दिसून आले, असे हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉ. उषा पद्मनाभन यांनी सांगितले. 
nज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ टक्क्यांपेक्षा कमी झाले होते आणि त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरू झाला अशाच रुग्णांवर बीसीजी लसीचा वापर करण्यात आला.
 

Web Title: CoronaVirus News : The BCG vaccine is effective on corona, useful in respiratory distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.