CoronaVirus News : Amitabh Bachchan, Son Abhishek Test Coronavirus+, Taken To Hospital | CoronaVirus News : अमिताभ, अभिषेक बच्चन यांना कोरोना; 'बिग बी'नी शेअर केली कविता

CoronaVirus News : अमिताभ, अभिषेक बच्चन यांना कोरोना; 'बिग बी'नी शेअर केली कविता

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन व त्यांचे पुत्र अभिषेक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील जया बच्चन, ऐश्वर्या रॉय, आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात वॉर्डच्या ११ च्या ३११ रुममध्ये उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या अजून काही चाचण्या करण्यात येणार आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. सोनम कपूर, क्रिती खरबंदा, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यासारख्या अनेक कलाकारांनी ट्विटवर रिट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटरवर आतापर्यंत जवळपास ५६ हजार रिट्विट करण्यात आले आहे. तसेच अनेक चाहते अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. याआधी त्यांना किडनीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत होती. तसेच यापूर्वी अनेकदा ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात जात असतात. अमिताभ यांच्या पाठोपाठ पुत्र अभिषेक बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अभिषेक यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अभिषेक बच्चन यानेही आपल्याला कोरोना झाल्याची माहिती टिष्ट्वट करून दिली आहे. त्याने म्हटले आहे की, वडील व मला दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. आम्ही याची संबंधित यंत्रणेला माहिती दिली होती. आमचे कुटुंब व स्टाफची चाचणी केली जात आहे. या काळात लोकांनी शांत रहावे घाबरू नये, अशी मी विनंती करतो, असेही अभिषेकने म्हटले आहे. बच्चन यांच्या स्टाफचीही चाच़णी करण्यात आली असून सर्व अहवाल अद्याप आलेले नाहीत.

- अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचे वृत्त समजताच ट्टिरवर अनेकांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काहींनी अमिताभ यांच्या धीर-गंभीर आवाजातील ‘गुजर जाएगा, गुजर जाएगा’ ही कविता शेअर केली.

गुजर जाएगा, गुजर जाएगा
गुजर जाएगा, गुजर जाएगा
मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है
गुजर जाएगा, गुजर जाएगा
जिंदा रहने का ये जो जज्बा है
फिर उभर आएगा
गुजर जाएगा, गुजर जाएगा
माना मौत चेहरा बदलकर आई है,
माना मौत चेहरा बदलकर आई है,
माना रात काली है, भयावह है....

रणबीर, नितू व करण जोहरही बाधित?
रिद्धिमा कपूर यांनी आयोजित केलेल्या अगस्त्या नंदाच्या बर्थडे पार्टीला अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. रणबीर कपूर, नितू कपूर, करण जोहर हेही या पार्टीत सहभागी झाले होते. त्यांनाही कोरोना झाल्याचे वृत्त आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना संसर्ग
अभिनेत्री रेखा यांचा बंगला महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आल्याचे समजते. रेखा यांच्या वांद्रे येथील स्थिती सी स्प्रिंग बंगल्याबाहेर दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात, त्यातील एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने पालिका प्रशासनाने बंगला कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
यापूर्वी, करण जोहर, बॉनी कपूर आणि आमिर खान यांच्या घरातील स्टाफनाही कोरोनाची लागण झाली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News : Amitabh Bachchan, Son Abhishek Test Coronavirus+, Taken To Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.