CoronaVirus News: राज्यात ५८,०९१ सक्रिय रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 07:14 IST2020-12-27T01:25:59+5:302020-12-27T07:14:06+5:30
राज्यात इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू आहे.

CoronaVirus News: राज्यात ५८,०९१ सक्रिय रुग्ण
मुंबई : राज्यात शनिवारी कोरोनाच्या २ हजार ८५४ रुग्णांचे निदान झाले, तर ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या मृत्युदर २.५७ टक्के असून ५८ हजार ९१ सक्रिय रुग्ण आहेत. बाधितांची एकूण संख्या १९ लाख १६ हजार २६३ एवढी आहे. शनिवारी १,५२६ रुग्ण बरे झाले. तर आजपर्यंत एकूण १८ लाख ७ हजार ८२४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के आहे. सध्या ४ लाख ६४ हजार १२१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ३ हजार ७०४ व्यक्ती संस्थामक क्वारंटाइन आहेत.
राज्यात इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार, आजपर्यंत आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या प्रवाशांची संख्या १,१२२ आहे. यापैकी बाधित आढळलेले प्रवासी १६ आहेत. यात नागपूर ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी ३, पुणे, नांदेड २, नांदेड, अहमदनगर आणि औरंगाबाद, रायगड प्रत्येकी १ रुग्ण आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या निकत सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोध घेण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित कोरोनाबाधित आढळले आहेत.