CoronaVirus News: राज्यात दिवसभरात 4304 कोरोनाबाधितांची नोंद; रिकव्हरी रेट 94.01 टक्क्यांवर
By मुकेश चव्हाण | Updated: December 16, 2020 21:53 IST2020-12-16T21:52:19+5:302020-12-16T21:53:47+5:30
राज्यात आतापर्यंत 48 हजार 434 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात 4304 कोरोनाबाधितांची नोंद; रिकव्हरी रेट 94.01 टक्क्यांवर
मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 4304 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 95 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 61454 पर्यंत खाली आली आहे. तसेच आज 4678 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 48 हजार 434 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17,69,897 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.01 टक्क्यांवर पोहचला आहे.
Maharashtra reports 4,304 new COVID-19 cases to take tally to 18,80,893; toll rises to 48,434 as 95 more patients die: Official
— Press Trust of India (@PTI_News) December 16, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,18,71,449 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18,80, 893 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,09,478 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3, 993 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्याबद्दल समाधान व्यक्त करून भूषण म्हणाले, भारतात 95 टक्क्यांपेक्षा जास्त रिकव्हरी रेट झाला आहे. दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये आजही जास्त रुग्ण निघत आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना फैलावाबद्दल स्थिती सध्या काळजीची आहे. दिल्लीत परिस्थिती सुधारली आहे. भारतात 15 कोटी 55 लाख चाचण्या झाल्या आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 40 हजारच्या जवळपास आहेत, तर 94 लाख लोक पूर्ण बरे झाले आहेत.