CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३,५२४ कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 01:45 AM2021-01-02T01:45:54+5:302021-01-02T07:00:39+5:30

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के

CoronaVirus News: 3,524 Corona patients in the state during the day | CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३,५२४ कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्क्यांवर

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३,५२४ कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्क्यांवर

Next

मुंबई :  राज्यात शुक्रवारी दिवसभरात तीन हजार ५२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर, तीन हजार ६१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९ लाख ३५ हजार ६३६ झाली आहे. तर, एकूण १८ लाख २८ हजार ५४६ रुग्ण काेराेनामुक्त झाले. 

राज्यात सध्या ५२,९०२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शुक्रवारी ५९ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्युदर २.५६ टक्के आहे. आतापर्यंत ४९ हजार ५२१ लोक कोरोनामुळे दगावले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के आहे. सध्या राज्यात दोन लाख ८१ हजार ३०३ व्यक्ती घरगुती तर तीन हजार ५७८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
 

Web Title: CoronaVirus News: 3,524 Corona patients in the state during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.